अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि 14 :- अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ता धाकर विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन 2021-22 साठी केंद्र शासनाच्याhttp://www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचे आहे. 

यावर्षी ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी रिनिवल स्टुडंट म्हणून अर्ज करावा तसेच नवीन विद्यार्थ्यांनी फ्रेश स्टुडंट म्हणून अर्ज करावा. तसेच इयत्ता 1 ली 10 वीच्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानित, विना अनुदानित कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा.इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांना गुणांची अट लागू राहणार नाही.पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे.शिष्यवृत्ती साठी अर्ज करणा विद्यार्थ्यांना15 नोव्हेंबर 2021 पर्यत ऑनलाईन अर्ज करता येईल.ऑनलाईन अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.

00000