Maharshtra News Nanded News

 वायुवेग…

 वायुवेग पथकाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश

मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई   

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाच्या ताफ्यात दोन नव्या इंटरसेप्टर वाहने नव्याने दाखल झाली आहेत. नांदेड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोन वायुवेग पथके कार्यरत असून या अत्याधुनिक वाहनांचा वापर हे पथक करणार आहे. या वाहना ब्रीद विश्लेषक Analyser, स्पीडगन टिंटमिटर आदी अत्याधुनिक उपकरणाचा समावेश आहे. यामुळे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास अधिक सोईचे होईल. वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालणाऱ्या वाहनावर मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्यावर कारवाई करणे शक्य होणार आहे.   

शासनाकडून वाहन क्र.एमएच 04-केआर-6426 व एमएच 04-केआर-6459 ही दोन इंटरसेप्टर वाहने गुरुवार 2 सप्टेंबरला प्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली असून त्याच्या कामकाजाची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते करण्यात आली. या वाहनांच्या समावेशामुळे रस्ता सुरक्षा विषयक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारीअनंत भोसले, मोटार वाहन निरीक्षक प्रमोद घाटोळ, मेघल अनासने, सुनिल पायघन, पंकज यादव, मनोज चव्हाण, पद्माकर भालेकर, राघवेंद्र पाटील, सहा.मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, लिपीक गाजूलवाड, शिंदे, कंधारकर, पवळे आदी कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

0000


 

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%