Maharshtra News Nanded News

पुरात वाहून…

पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह आढळले 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी-नाल्यांना अचानक पूर आला होता. अचानक आलेल्या या पुरामुळे कंधार तालुक्यातील गगनबिड येथील 30 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास 26 वर्षाचा युवक उमेश रामराव मदेबैनवाड हा ओढयाच्या पाण्यात वाहून गेला होता.  आज 1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वा. ऋषि मंदिराजवळ मन्याड नदीपात्राचे बॅक वॉटरमध्ये घटनास्थळापासून अंदाजे 3 किमी अंतरावर त्याचा मृतदेह मिळाला असल्याचे कंधार तहसिलदार यांनी कळविले आहे. 

लोहा तालुक्यातील मौ. सावरगाव येथील सौ. पार्वतीबाई संभाजी दगडगावे या 30 ऑगस्ट 2021 रोजी पुराच्या पाण्यात ओढयात वाहून गेल्या होत्या. आज 1 सप्टेंबर 2021 रोजी त्र्यंबक धारबा जाधव यांच्या शेतात मालदरा जवळ दुपारी 1.45 वाजता घटनास्थळापासून 2 किमी अंतरावर त्यांचा मृतदेह मिळाला असल्याचे लोहा तहसिलदार यांनी कळविले आहे. 

वरील दोन्ही घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 ऑगस्ट रोजी भेट देवून शोध व बचाव कार्याला वेग येण्यासाठी मनपाच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील शोध व बचाव पथक घटनास्थळी मदतीला पाठविले होते. त्यानंतर लगेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरफ धुळे यांची मदत मागितली होती. परंतु ही टीम येण्यापुर्वीच दोन्ही मृतदेह मिळाले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: