परभणी,दि 26 – सध्याचा कोरोनाचा काळ पहाता सणउत्सव साजरे करताना देखील आता आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यामुळे येणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपुरक व निर्सगवर्धक साजरा करावा असे आवाहन परभणीच्या जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

      सध्या कोरोनाचा संर्सग कमी होत असला तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता काळजी आवश्यक असल्याने परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सण-उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.मोठ्या थाटात साजरा होणारा गणेशोत्सव आता जवळ येत आहे.गत वर्षी पासून कोरोनामुळे सणउत्सवावर मर्यादा आल्या आहेत.यंदाही तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे सणउत्सव साजरे करावे लागणार आहेत.

महाराष्ट्राला गणेशोत्सवाची मोठी पंरपरा आहे.लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली होती. समाज या निमीत्ताने एकत्र यावा,संघटीत व्हावा,विचारांची देवानघेवान व्हावी, भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशातून ब्रिटीशांविरोधात लढा देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरु केला होता.परंतु सध्याची परिस्थिती पाहता आपल्या आरोग्य व पर्यावरण रक्षणाकडे देखील लक्ष द्यावे लागेल, ही सामुहीक जबाबदारी आहे. 

यावर्षी आपण स्वांतत्र्यांचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्यानिमीत्ताने जिल्ह्यात इको फ्रेंडली गणपती मुर्तींची प्रतिष्ठापना करावी.

दरवर्षी गणेशोत्सवात पीओपीपासून बनवलेल्या गणेशमुर्तींची स्थापना केली जाते.परंतु अशा केमीकलपासून बनवलिल्या मुर्ती विसर्जननानंतर विरघळत नसल्याने त्यामुळे पर्यावरणाची हानी होते.पिण्याचे पाणी,शेतीपिके यांना फटका बसतो.त्यातुन अनेक वर्षापासून इको फ्रेंडली गणपती ही संकल्पना पुढे आली आहे..पर्यावरणाच्या दृष्टीने गणेश मुर्तीचे पर्याय समोर आले आहे.शहरात  शेतातील माती व कोकोपीट पासून तयार केलेल्या गणेश मुर्ती तसेच शॅडो माती आणि इतर इको फ्रेंडली गणपती मुर्ती उपलब्ध आहेत. श्री विसर्जनाच्या दिवशी घरीच मुर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे.

शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.सुचिता पाटेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
     जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणाला पुरक असा साजरा करावा,पिओपीपासून तयार केलेल्या मुर्तीऐवजी मातीची गणपती मुर्ती स्थापना करावी,तसेच घरीच विसर्जन करावे  असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी केले आहे.तसेच शिक्षण विभागाकडून देखील विद्यार्थ्याकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शपथपत्र घेतले जाणार आहे.त्यासाठी सर्व शाळांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहीती डॉ.पाटेकर यांनी दिली.

                                  00000