Maharshtra News Parbhani News

मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन

 

 

      परभणी, (जिमाका), दि.24 :- जिल्ह्यात  डीईआयसी व आरबीएसके विभाग आणि स्माईल ट्रेन संस्था अमेरीका तसेच श्रीराम हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील जिल्हा रुग्णालयात जन्मापासून दुभंगलेले ओठ व दुभंगलेली टाळु असलेल्या बालकांसाठी बुधवार दि.1 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीर परभणी येथील  जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात होणार असून गरजुंनी शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%