परभणी, (जिमाका), दि.24 :- जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत तर गट कर्ज व्याज परतावा योजना मर्यादा 50 लाखापर्यंत या दोन योजना शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आल्या आहेत. विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच‍ विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट जातीमधील इच्छुक उमेदवारांनी वंसतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या vjnt.in या वेबप्रणालीवर ऑनलाईन अर्ज दाखल करावेत व दोन योजनेचा लाभ घ्यावा. असे  महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-