Maharshtra News Parbhani News

लोकशाही दिनाचे आयोजन

 

      परभणी, (जिमाका), दि.24 :- सर्वसामान्‍य जनतेच्‍या तक्रारी, अडचणींची न्‍याय व तत्‍परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्‍यासाठी प्रभावी उपाययोजना म्‍हणून लोकशाही दिन राबविण्‍यात येत असतो. सोमवार दि.6 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी लोकशाही दिनात सादर करावयाच्या तक्रारीचे अर्ज दोन प्रतीत विहीत नमुन्यात परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात बुधवार दि.1 सप्टेंबरपुर्वी सादर करावेत. असे आवाहन सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%