Maharshtra News Nanded News

 शिकाऊ…

 

शिकाऊ परवानाधारकांना घरबसल्या चाचणी सुविधा

पात्र वैद्यकीय व्यावसायिकांना सारथी प्रणालीवर युझरआयडी 

नांदेड (जिमाका) दि. 18 :  आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस शिकाऊ अनुज्ञप्ती सेवेचा लाभ घेण्याची तरतुद शासनाने केली असून अर्जदारास घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती (परवाना) चाचणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. चाचणीत उत्तीर्ण होऊन घर बसल्या शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही.   

मोटार वाहन कायदा व अनुषंगिक नियमात नमूद अनुज्ञप्ती विषयक कामांसाठी आवश्यक नमुना-1 (अ) हे मेडीकल प्रमाणपत्र पात्र डॉक्टरामार्फत (नोंदणीकृत एमबीबीएस वैद्यकीय व्यावसायिक किंवा त्यावरील अर्हता प्राप्त) ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्रामार्फत विकसित केली आहे. अर्जदारांची तपासणी संबंधीत डॉक्टारामार्फत करुन नमुना-1 (अ) अपलोड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र डॉक्टरांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन परिवहन कार्यालयामार्फत युझरआयडी प्राप्त करावाचा आहे. सर्व संबंधित वैद्यकीय व्यवसायिकांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह अनुज्ञप्ती विभाग प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून युझर आयडी प्राप्त करुन पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

000000

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: