Maharshtra News Parbhani News

दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीबाबत आवाहन

 

  

परभणी,(जिमाका), दि.17 :- राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांच्या परिपत्रकानूसार दस्त नोंदवितांना अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दुय्यम निबंधकांना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये शेतजमीन, प्लॉटच्या नोंदणी सरसकट बंद झालेल्या आहेत व त्यासाठी जिल्हाधिकारी किंवा नियोजन प्राधिकाऱ्यांची परवानगी लागत असल्याबाबत अफवा पसरली आहे. अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी परभणी यांनी दिली आहे.

परिपत्रकानूसार एखाद्या सर्वे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे त्याचा सर्व्हे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्त नोंदणी होणार नाही, मात्र त्याच सर्व्हे नंबरचा ले-आऊट करुन त्यामध्ये एक, दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकारणाची मंजूरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आऊट मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होवू शकणार आहे. यापुर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल अशा तुकड्याच्या खरेदी -विक्री व्यवहारासाठी सुध्दा उक्त कायद्यातील कलम 8-ब नूसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.  एखाद्या अलहिदा निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चित होवून, मोजणी होवून त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास अटी व शर्ती लागु राहतील. तसेच वरील नमुद बाबी परिपुर्ण असलेल्या मिळकतीच्या दस्तऐवजाची नोंदणी करता येईल. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%