Maharshtra News Parbhani News

ज्येष्ठ नागरिकांसाठी कक्षाची स्थापना

 

  

परभणी,(जिमाका), दि.17 :- ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रकारे ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षात विविध प्रकारचे पुस्तके, वृत्तपत्रे तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, अतिशय शांत वातावरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन करणे, आई-वडिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण अधिनियम 2007 च्या कलम 5 खाली अर्ज सादर करणे व तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उदरनिर्वाह व कल्याण अधिनियम 2007 कलम 9, 11, 14, 24 मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याबाबत समस्यांचे निवारण करण्यासाठी कक्ष स्थापन केलेला आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर ते कक्षात किंवा संबंधित तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधु शकतात. कार्यालयीन वेळेत सामाजिक न्याय भवन जायकवाडी वसाहत कारेगाव रोड समाज कल्याण येथे ज्येष्ठ नागरिकांनी कक्षाचा लाभ घ्यावा. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: