Maharshtra News Nanded News

 कंधार…

 कंधार तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सव संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- तहसील कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन नुकतेच 13 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. हा महोत्सव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्रीमती एम आर सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. 

रानभाज्यांचे आरोग्यासाठीचे महत्व, त्याची नैसर्गिक उपलब्धता, किटकनाशकांच्या अन्नापासून मुक्त व विविध औषधी गुणधर्म याबाबतीत तसेच या रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला. कार्यक्रमासाठी तालुक्यातून विविध बचतगटांचे शेतकरी बांधवाचा भाजीपाला, सुयोग इंडस्ट्री संगुचीवाडी यांचे विविध वजनाचे लाकडी घाण्यावरील तेल, मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर अशी विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. 

याप्रसंगी पेठवडज शेतकरी व कर्मवीर भाऊराव पाटील शेतकरी गटाचे पांडुरंग व्‍यंकटराव कंधारे, संगुचिवाडी येथील बळीराम गंगाराम मुंजे, पानशेवडी येथील अनिल बाबुराव मोरे, ब्रह्माजी संभाजी मोरे, यशोदीप चिली पावडर इंडस्ट्रीचे विठ्ठल वारकड, सुयोग फूड इंडस्ट्री संगुचिवाडी येथील चंद्रकांत, पेठवडज येथील बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर डावखरे आदी शेतकऱ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून “विकेल ते पिकेल” “शेतकरी ते ग्राहक थेट विक्री” या रानभाजी महोत्सवाचे आयोजन मागील वर्षापासून सुरू असून चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला आहे.  जिल्हा स्तरावरील यशस्वी योजनेंतर्गत या प्रकारचे महोत्सव आयोजन करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

विक्रीसाठी रानभाज्या, करटुले, वाघाटे, आघाडा, अळू कुंजर, कुरडू, डेवडांगर, नाय, केना, सुरकंद, मोठी घोळ, छोटी घोळ, अंबाडी, तरोटा, कडीपत्ता, चमकुरा, चुका, शेपू या रानभाज्या, उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. या संपूर्ण उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी होती. रानभाज्या महोत्सवातून शेतकऱ्यांना विक्रीसाठी नवे दालन उपलब्ध झाले असून “विकेल ते पिकेल” या शासनाच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी राबविण्यात आला. 

तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी विकास नारळीकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, मंडळ अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती. 

000000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: