Maharshtra News Parbhani News

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या मुल्यात्मक जागरासाठी विशेष उपक्रम

 

 

·        दर आठवड्याला एक प्रमाणे वर्षभर होणार 52 उपक्रम

·        जिल्हास्तरीय उपक्रमांच्या लोकाभिमुखतेसाठी नागरिकांनी               सूचना सादर कराव्यात 

– जिल्हाधिकारी आंचल गोयल 

  

परभणी (जिमाका) दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव साजरा करतांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेज्यांनी कारावासात यातना सहन केल्या त्याचे मोल नव्या पिढीपर्यंत वाहते करण्यासाठी व लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या कर्तव्य दक्ष नागरिकतेसाठी या स्वातंत्र्य दिनापासून वर्षभर विशेष उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली. 

यासंदर्भात राज्यस्तरीय समितीकोअर समितीजिल्हास्तरीय समितीमहानगरपालिका स्तरीयतालुकास्तरीय समितीग्रामस्तरीय समित्यांची स्थापना केली जात आहे. भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव परभणी जिल्ह्यात गावपातळीपर्यंत खऱ्या अर्थाने लोकउत्सव व्हावा यासाठी अधिकाधिक लोकसहभाग घेतला जाणार असून दर आठवड्याला एका विशेष उपक्रमाचे आयोजनही केले जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.  

या अमृत महोत्सवांतर्गत भारतीय स्वातंत्र्य लढासंकल्पसंकल्पनासाध्य व कार्यवाही या बाबींवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यावर भर दिला जाणार आहे. यात प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणेपथनाट्यमहानाट्यचर्चासत्रप्रदर्शनमेळावेलोककलेचे सादरीकरणहेरिटेज वॉकसायकल वॉकप्रगतीपथावरील महाराष्ट्रलोकसहभागातून कार्यक्रमलोककलाअभिजात कला अशी प्रस्तावित कार्यक्रमाची रुपरेषा असू शकेल. यासंदर्भात अधिक लोकाभिमूखता असणारे जर कोणते उपक्रम असतील तर नागरिकांनीत्या-त्या क्षेत्रातील अभ्यासकांनी आपले अभिप्राय-सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात सादर कराव्याअसे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

अमृत महोत्सवी भारत या उपक्रमात महाराष्ट्राचा वैशिष्ट्यपूर्ण सहभाग घेण्याबाबत नियोजन केले जात आहे. “इंडिया@75 इंडिया@2047″ थीम अंतर्गत युवाशक्तीकौशल्यविकासमाहिती तंत्रज्ञानग्रामविकासातून राष्ट्र विकासरोजगार निर्मितीअर्थसाक्षरतासांस्कृतीक निर्देशांक वाढमाझी वसुंधरामहिलांचा वाढता सहभागदर्जेदार आरोग्य सुविधाचिरंतन विकाससुशासनसामाजिक सलोखापर्यटनास अधिक संधी यावर भर असेल. अबालवृद्धांसह सर्वांचा सहभाग विविध उपक्रमातून घेण्यासाठी काही स्पर्धात्मक कार्यक्रमही निश्चित केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली.

 

 

                                                                                    –*-*-*-*-

Attachments area

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: