Maharshtra News Parbhani News

जिवनसत्त्वे व खनिजांनी परिपुर्ण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहरात करावा – संचालक डॉ.डी.बी. देवसरकर

 

           परभणीदि. 10 :- नैसर्गिकरित्या शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्याचे दररोजच्या जेवणामध्ये समावेश असणे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जिवनसत्त्वे व खनिजांनी परिपुर्ण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करावा. असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.बी. देवसरकर यांनी केले.

             वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या काळ्या कमानीजवळ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.9 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित राजभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक एस.बी. आळसे, उपप्रकल्प संचालक के.आर.सराफ, तालुका कृषी अधिकारी पी.बी.बनसावडे, विस्तार विद्यावेता गजानन गडदे आदी उपस्थित होते.

             रानभाज्या या औषधी गुणधर्मांनी परिपुर्ण असतात तसेच त्यांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. असेही संचालक डॉ.देवसरकर  यांनी यावेळी सांगितले. महोत्सवामध्ये कर्टुली, टालका, पाथरा, हदगा, अळू, घोळ, तांदूळजा, भुई आवळा, कपाळफोडी, कुर्डू या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या तर वाघाटे, करटुले, काशीफळ, करवंद, ड्रॅगनफ्रुट इत्यादी रानफळे यांची माहिती व शेतकरी गटाच्या माध्यमातून विक्रीस ग्राहकाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश इक्कर, प्रमोद रेंगे,  विलास जोशी, शिवराज कदम, योगेश पवार, श्री.संघई, श्री.कच्छवे, रवी माने, स्वाती घोडके यांच्यासह कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शेतकरी उपस्थित होते.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: