Maharshtra News Nanded News

 जिल्हा जात…

 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत ऑनलाईन वेबिनारचे आज आयोजन 

नांदेड, (जिमाका) दि. 12 :- जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेची संपूर्ण माहिती व जनजागृती करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वा. झूम ॲपवर वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार सर्वांसाठी खुला असून जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने नागरिकांच्या अडीअडचणी व शंकाचे निराकरण करण्यासाठी समितीचे अधिकारी मागदर्शन करुन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. सर्व अर्जदार, पालक, विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी या ऑनलाईन वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदारांना शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर कारणासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणापत्र प्राप्त करावे लागते. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीयेबाबत जनजागृती करणेसाठी व गरजु अर्जदारांना विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज कसा करावा. त्यासोबत कोणते पुरावे सादर करावे याबाबत या वेबिनारचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम झूम ॲप डाऊनलोड करावे. जॉईन मिंटीग हा पर्याय निवडावा. त्यानंतर मिटींग आयडी : 334 156 8480 हा असून पासवर्ड 1234 हा समाविष्ट करण्यात यावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव आ. ब. कुंभारगावे यांनी केले.

000000 

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%