परभणीदि. 10 :- जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण झालेल्या गरजु प्रशिक्षणार्थ्यांसाठी अहमदाबाद येथील सुझूकी मोटर्स प्लॅन्टसाठी शुक्रवार दि.13 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता  औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास जोडारी, डिझेक मेकॅनिक, यांत्रिक मोटारगाडी, कातारी, यंत्र कारागीर, संधाता, विजतंत्री, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक आणि पेंटर जनरल व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.  असे परभणीच्या मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगीक सुचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-