Maharshtra News Nanded News

 धनगर…

 

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश

अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे सन 2021-22 मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याकडून अर्ज येत्या मंगळवारी 31 ऑगस्ट पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यात आली आहेत. या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत शिक्षण देण्याबाबत निर्णय राज्य शासनाच्यावतीने घेतला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्यासाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत. या शाळेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य शैक्षणिक साहित्य शालेय गणवेश आदी सुविधा राज्य शासनाकडून मोफत दिल्या जाणार आहेत.

 

योजनेच्या अटी व शर्ती

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी धनगर समाजाचा असावा. विद्यार्थ्याच्या पालकाने विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न मर्यादा 1 लाख इतकी असावी. सन 2021-22 या वर्षात विद्यार्थी पहिली इयत्ता किंवा दुसरी इयत्तेत प्रवेशित असावा. नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्यासाठी निवड झालेल्या शाळेची यादी ही पुढील प्रमाणे आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी  विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल. 

शिवबा एज्यूकेशन सोसायटी नांदेड या संस्थेची शाळा जिनियस पब्लिक स्कूल वसंतनगर ता. जि.  नांदेड शासनाकडून मंजूर विद्यार्थी संख्या 300. कै. व्यंकटराव पाटील ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान डोंगरगाव ता. लोहा या संस्थेची शाळा श्री शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कूल दत्तनगर नांदेड शासनाकडून मंजूर विद्यार्थी संख्या 50. गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट शंकरनगर ता. बिलोली या संस्थेची शाळा गोदावरी मनार पब्लिक स्कूल शंकरनगर ता. बिलोली जि. नांदेड शासनाकडून मंजूर विद्यार्थी संख्या 100 एवढी आहे. 

प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज 9 ते 31 ऑगस्ट 2021 कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नमस्कार चौक नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावीत. या योजनेचा विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे अवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

000000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%