परभणीदि. 5 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

            शुक्रवार दि.6 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या सोबत आढावा बैठकीसाठी राखीव. सायंकाळी 06.05 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृहात राखीव व मुक्काम करतील.

            शनिवार दि.7 ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी 9 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह येथून प्रशासकीय इमारतीकडे प्रयाण. सकाळी 09.05 वाजता आगमन व वसंतराव नाईक आणि भगवान सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करतील. सकाळी 9.12 ते 9.17 वाजेपर्यंत विद्यापीठातील बांबू प्रात्यक्षिक प्लॉटला भेटीसाठी राखीव. सकाळी 09.19 ते 09.50 वाजेपर्यंत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पास भेट. सकाळी 9.52 ते 10.02 वाजेपर्यंत अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या उष्मायन केंद्राला भेट देण्यासाठी आणि तरुण उद्योजकांशी संवाद साधतील.  सकाळी 10.02 वाजता अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातून प्रयाण. सकाळी 10.04 ते 10.14 वाजेदरम्यान मुलींचे वस्तीगृहवसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी  येथे आगमन व विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.  सकाळी 10.16 ते 10.26 वाजेपर्यंत ग्रंथालय वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी  येथे आगमन व वृक्षारोपणासाठी राखीव. सकाळी 10.28 वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृहाकडे प्रयाण करतील.सकाळी 10.28 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यापीठाचा अहवाल सादर करणे, विद्यापीठाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या व्हिडिओ फिल्मचे प्रदर्शन, विद्यापीठाच्या हरित चळवळीचा व्हिडिओ फिल्म प्रदर्शित व प्राध्यापकांशी संवाद साधतील. दुपारी 12 वाजता कृषी महाविद्यालयाच्या सभागृह येथून मोटारीने प्रयाण. दुपारी 12.02 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.30 वाजता वैज्ञानिक भवन विश्रामगृह,वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी  येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-