Maharshtra News Parbhani News

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

 

 

           परभणीदि. 6 :- भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयामार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फौंडेशनतर्फे चालवली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सेवा आणि माहितीसाठीसाठी मोफत हेल्पलाईन सुविधा 14567 क्रमांकावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सहानुभूतीपूर्वक सेवा करुन सुखी आणि निरोगी जीवन वृंध्दीगत करणे हे राष्ट्रीय हेल्पलाईनचे ध्येय  आहे. विविध सरकारी विभाग, सामाजिक संस्था, स्वयंसेवक अशा अनेक वचनबध्द भागीदारांच्या सहभागातून आवश्यक ती माहिती आणि सहकार्य करुन भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार करुन ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हे राष्ट्रीय हेल्पलाईनचे धोरण आहे. मार्गदर्शन आणि सहकार्य देण्यासाठी देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांपर्यत पोहोचणे, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासकीय योजना व कार्यक्रमांची माहिती प्रसारित करणे व त्यांच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, ज्येष्ठ नागरिकांना तक्रार निवारण यंत्रणा पुरविणे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये आशा आणि विश्वास निर्माण करणे आणि त्यांचा वृध्दापकाळ आनंददायी करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या विविध गरजा समजून घेण्यासाठी आणि आवश्यक धोरणे आणि अंमलबजावणीची यंत्रणा तयार करणे आदी राष्ट्रीय हेल्पलाईनची उद्दीष्टे आहेत. असे निवासी उपजिल्हाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

 

-*-*-*-*-

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%