परभणी, दि. 6 :- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता माहिती तंत्रज्ञान केंद्रासमोरील काळ्या कमानीजवळ रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परभणी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रानभाज्या महोत्सवास भेट द्यावी. असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे यांनी केले आहे.

            रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक, जीवनसत्वे व खनिजे असतात. रानभाज्या या औषधी गुणधर्माबाबत परिपुर्ण असतात. रानभाजीला कोणतीही फवारणी, खताचा वापराशिवाय नैसर्गिकरीत्या उगवलेल्या असल्याने त्या विषमुक्त असतात. अशा विविध भाज्यांची शहरी ग्राहकांना ओळख व्हावी, आहारातील त्यांचे महत्व पटावे व खरेदीस उपलब्ध व्हाव्यात याअनुषंगाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-