Maharshtra News Parbhani News

जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल रुजू

 

      परभणी, दि. 5– परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पदभार घेतल्यानंतर मा. राज्यपाल महोदयांच्या दौऱ्या निमित्त विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली.

 2014 साली आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र कॅडेर मिळाले. अकोल्या जिल्हयात 2015-16 मधे त्यांनी परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला. केंद्र शासनाच्या पेट्रोलीयम नॅचरल गॅस विभागामध्ये सहायक सचिव म्हणून कार्य केले.

पहिली नियुक्ती नोव्हेंबर 2016 पासून पालघर जिल्हयात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मे 2018 पासून रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

 परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्यानी सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत होत्या.

      श्रीमती आंचल गोयल यांचा जन्म पंजाब राज्यात दिनांक 1 जुलै 1990 रोजी झाला आहे. त्यांचे शिक्षण चंदीगड येथे बीई ईलेक्टॉनिक्स पदवी सन 2012 मध्ये मिळविली आहे. सन 2013 मध्ये आयकर विभागात निवड झाली होती. आई वडील बॅकींग क्षेत्रात आहेत. तर पती निमित गोयल 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

                              000000

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: