Maharshtra News Nanded News

 राज्यपाल…

 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार 5 ऑगस्ट 2021 रोजी मुंबई येथून सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.05 वा. नांदेड विमानतळ येथून वाहनाने प्रशासकिय भवन, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. विद्यापिठ येथे आगमन. सकाळी 10.30 वा. विद्यापिठ संदर्भातील दृकश्राव्य सादरीकरणासाठी राखीव. सकाळी 10.45 वा. विद्यापीठ परिसरातील पावसाच्या पाण्याच्या पूर्नभरण उपक्रमाच्या पाहणीसाठी प्रस्थान. सकाळी 10.47 वा. ते 11.10 वाजेपर्यंत विद्यापिठातील विविध पूर्नभरण उपक्रमांच्या ठिकाणी भेट व पाहणी आणि विद्यापिठातील श्री गुरु गोबिंद सिंघजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्रीय इमारतीबाबत आढावा. सकाळी 11.10 वा. विद्यापिठातील जलपूर्नभरण उपक्रमांची पाहणी. सकाळी 11.12 वा. विद्यापिठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारत येथे आगमन. सकाळी 11.12 ते 11.17 पर्यंत अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11.17 वा. विद्यापिठ परिसरातील मुलांच्या वसतीगृहाकडे प्रयाण. सकाळी 11.19 वा. मुलांचे वसतीगृह येथे आगमन. सकाळी 11.19 ते 11.24 वाजेपर्यंत विद्यापिठ परिसरातील अल्पसंख्यांक मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11.24 वा. अल्पसंख्यांक मुलांचे वसतीगृह येथून प्रस्थान. सकाळी 11.26 वा. विद्यापिठातील बॉटनिकल आणि बायोडायर्व्हसिटी पार्ककडे प्रस्थान व दुपारी 12 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 12 वा. येथून विद्यापिठातील विश्रामगृहाकडे प्रस्थान व दुपारी 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2 वा. विद्यापिठातील विश्रामगृह येथून नांदेड शहरातील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराकडे प्रयाण व दुपारी 2.15 वा. आगमन. दुपारी 2.15 ते 3 वाजेपर्यंत तख्त सचखंड श्री हुजूर साहिब नांदेड येथील प्रशासकिय प्रमुखांसमवेत बैठक व राखीव. दुपारी 3 वा. येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान. दुपारी 3.10 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व सायं 5 वाजेपर्यंत आढावा बैठक. सायं. 5 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकिय विश्रामगृह नांदेडकडे प्रस्थान व मुक्काम. 

शुक्रवार 6 ऑगस्ट 2021 रोजी शासकिय विश्रामगृह नांदेड येथून सकाळी 9 वा. वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील.

शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी परभणी येथून वाहनाने दुपारी 3 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.15 वा. नांदेड विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

000000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: