Maharshtra News Nanded News

 डाकघर…

 डाकघर अधिक्षक कार्यालयात विमा सल्लागार पदाच्या मुलाखती 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन (आरपीएल) योजनेंतर्गत विमा सल्लागारच्या (डायरेक्ट एजंट) भरतीसाठी मुलाखती घेण्यात येत असून अर्ज डाकघर अधिक्षक कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन शुक्रवार 30 जुलै 2021 पर्यत कार्यालयीन वेळेत अधिक्षक डाकघर नांदेड 431601 येथे मुलाखतीसाठी यावे. येतांना सोबत बायोडाटा, मुळ कागदपत्र, प्रमाणपत्र, अनुभव  प्रमाणपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड विभागाचे अधिक्षक डाकघर पी. स. माधवराव यांनी केले आहे. 

पीएलआय व आरपीएल योजनेच्या एजंट विमा सल्लागार या पदासाठी  पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहे.  उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेत अर्जदार हा 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. ज्यात केंद्रीय, राज्य मान्यता प्राप्त असावी. 

श्रेणी-बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्राम पंचायत सदस्य इ. टपाल जीवन विमासाठी थेट असे अर्ज  करु शकतात. 

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती आदी बाबी लक्षात घेतल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी / केव्हीपीच्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. ही परीक्षा 3 वर्षेच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असेही अधिक्षक डाकघर नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: