Maharshtra News Nanded News

 दहावीच्या…

 

दहावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध 

नांदेड (जिमाका) दि. 16:- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक उपलब्ध झाला नसल्यास अशा विद्यार्थी व संबंधितांनी मंडळाच्याhttp://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील सूचनेप्रमाणे कार्यवाही करुन आपला बैठक क्रमांक उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2021 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्यात आली नाहीत. माध्यमिक शाळांना त्यांचे लॉगइन आयडी व युजर पासवर्डद्वारे सर्व विद्यार्थ्यांचे नाव व बैठक क्रमांकनिहाय माहिती उपलब्ध करुन दिली होती. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक अवगत करुन देण्याबाबत सूचित केले होते. बैठक क्रमांकाबाबत माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधितांनी संकेतस्थळावरील सूचनेनुसार कार्यवाही करावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.  

0000

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: