परभणी, दि.12 :- खरीप पिक कर्ज वाटप हंगाम दि.1 एप्रिल 2021 पासून सुरु झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधाच्या संयुक्त विद्यमाने संबंधित बँक शाखेमार्फत कर्ज वाटपाची मोहीम राबविण्यात येत आहे. तरी परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी आपले गाव ज्या बँक शाखेला दत्तक आहे त्या बँक शाखेत आपली कागदपत्रे स्वत: किंवा गावच्या तलाठीमार्फत दाखल करुन शासनाच्या  व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक नानासाहेब कदम यांनी केले आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या दि.11 जुन 2021 रोजीच्या शासन निर्णयानूसार खरीप हंगाम 2021-22 पासून 3 लाख रुपयांपर्यतच्या अल्प मुदत पिक कर्जासाठी डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत येाजनेअंतर्गत 3 टक्के व्याज परतावा योजना लागु करण्यात आली आहे. त्यामुळे 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदत पिक कर्जासाठी केंद्र शासनाची 3 टक्के व राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत 3 टक्के व्याज सवलत विचारात घेतल्यानंतर पिक कर्ज शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने उपलब्ध होईल. तसेच शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी बँकेत कोणत्याही खाजगी दलालामार्फत कागदपत्रे दाखल करु नये. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-