Maharshtra News Parbhani News

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते न्यूमोकोकल आजारापासून बचावाची लहान बाळास लस

 

 

 

      परभणी, दि.12 :-लहान मुलांना न्यूमोकोकल आजारापासून सुरक्षित ठेवण्याकरीता सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन (पीसीव्ही) लस समाविष्ट करण्यात आली असून  जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवार दि.12 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या हस्ते लहान बाळाला जिल्ह्यातील पहिला डोस देवून लसीकरण मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला.

 यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ. दुर्गादास पांडे, डॉ. प्रकाश डाके, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे  यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: