Nanded City News Nanded News

नांदेड:भूकंपाचे सौम्य धक्के٫ नागरिकांनो घाबरून जाऊ नकात – जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि 11 :- आज सकाळी 8:33 मि. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यवतमाळ जिल्ह्यात साधूनगर येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे National Centre for Seismology च्या संकेतस्थळावरून निदर्शनास येत आहे. याची तीव्रता 4.4 रिष्टर स्केल एवढी होती.

मी आपल्या शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्यालय यांच्याशी संपर्कात असून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आम्ही घेत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.

%d bloggers like this: