Maharshtra News Parbhani News

जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा आणि सीएससी केंद्र रात्री दहा पर्यंत सुरू

 

▪️शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अधिक सुलभता
परभणी, दि.7 :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा भरता यावा यासाठी पिक विमा भरण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांच्या वाहनांना संचारबदीतून सुट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व महा ई सेवा केंद्र आणि सी.एस.सी.केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे आदेश परभणीचे जिल्हादंडाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून दि.28 जूनपासून लेव्हल-3 मधील तरतुदीनूसार विविध सेवा, आस्थापना, दुकाने सुरु ठेवण्याबाबत सुधारीत आदेश निर्ममित करुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सायंकाळी 5 ते सकाळी 7 या वेळेत संपुर्ण जिल्ह्यात संचारबदी आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्याने महा ई सेवा केंद्र व सी.एस.सी. केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी तसेच शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहू नये याकरीता जिल्ह्यातील केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: