परभणी, दि.2 :- कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी दिन व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.1 जुलै 2021 रोजी पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पुरस्कार प्राप्त व पिक स्पर्धेतील विजेत्या एकुण 13 शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती मिराताई टेंगसे, समाजकल्याण सभापती रामराव उबाळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास जोगदंड, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे,शिक्षण व विस्तार संचालक डॉ.डी.बी.देवरसकर,  वरिष्ठ किटकशास्त्रज्ञ डॉ.झंवर, कृषी विद्यावेत्ता वरिष्ठ शास्त्रज्ञ  डॉ.जी.डी.गडदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमास दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-2019 प्राप्त शेतकरी देवराव आबाजी शिंदे, कृषीभूषण-2018 शेतकरी बाबासाहेब तात्याराव रणेर,  जिजामाता कृषीभूषण पुरस्कार-2019 प्राप्त शेतकरी श्रीमती मेघा विलासराव देशमुख, उद्यानपंडित पुरस्कार-2019 प्राप्त शेतकरी प्रताप किशनराव काळे, यांच्यासह जिल्हास्तरीय पिक स्पर्धा विजेते विष्णुपंत दगडोबा टेहरे, श्रीमती सुरेखा पांडूरंग सोळंके, राजेश विनायक शेवाळे, बाबाराव उगाजी पाते, श्रीमती लताबाई अंबादास सोनटक्के, अनिल प्रल्हाद काळे, बाबासाहेब अंबादास कवड, ज्ञानेश्वर माणिकराव काकडे, प्रभाकर तुकाराम काळे, आदीचा पुष्पहार व शाल आणि श्रीफळ देवून  तसेच पिक स्पर्धा विजेत्यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-