परभणीदि. 1 :- संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण क्षरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण मोहिम परभणी जिल्हयात राबविली जात आहे. मानवत,  सोनपेठ,  गंगाखेड,  पालम व जिंतुर हे परभणी जिल्हयातील कुष्ठरोगाबाबत अती जोखमीचे तालुके म्हणून ओळखले जातात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण तपासणीचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण क्षयरुग्ण शोध व नियमित संनियंत्रण ( Active Case Detection & Regular Surveillance ) कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी  यांचे दालनात घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरडॉ शंकरराव देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ गित्ते राहुल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कालीदास निरसजिल्हा क्षयरोग अधिकारीडॉ.किशोर सुरवसेनिवासी वैद्यकिय अधिकारीडॉ.रावजी सोनवनेमाता बाल संगोपन अधिकारीडॉ.व्ही.आर पाटीलजिल्हा हिवताप अधिकारीडॉ कल्पना सावंत आरोग्य अधिकारी – म.न.पा . तसेच आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.


जिल्ह्यातील अतिजोखमीच्या असलेल्या मानवत सोनपेठ गंगाखेड पालम व जिंतुर या तालुक्यात ही मोहीम  दिनांक १ जुलै २०२१ ते ३१ आक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित केली जात आहे. कुष्ठरोगाबाबत कमी जोखमीचे  असलेले परभणी पाथरी सेलु व पुर्णा या तालुक्यात दिनांक १ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे . या मोहिमे अंतर्गत ग्रामिण भागातील सर्व गावे व शहरी भागातील स्लम भागातआशा किंवा महिला स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी किंवा पुरुष स्वयंसेवक यांचे मार्फत घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. संशयीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधुन त्यास वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत तात्काळ उपचार सुरु करण्यात येतील. कुष्ठरोग व क्षयरोग प्रसाराची साखळी अशा तात्काळ उपचारातुनच खंडीत होण्यास मदत होईल.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरडॉ शंकरराव देशमुख  जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉ गित्ते राहुल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉ.कालीदास निरस, जिल्हा क्षयरोग अधिकारीडॉ.किशोर सुरवसेनिवासी वैद्यकिय अधिकारीडॉ. रावजी सोनवने,  माता बाल संगोपन अधिकारीडॉ.व्ही.आर पाटीलजिल्हा हिवताप अधिकारी,  डॉ. कल्पना सावंत आरोग्य अधिकारी – ..पातसेच  आरोग्य  विभागातील  जिल्हास्तरीय  अधिकारीकर्मचारी उपस्थित होते .

या मोहिमे अंतर्गत आशा  आरोग्य कर्चचारी यांचे मार्फत कुष्ठरोगाबाबतची शारीरीक तपासणी करून घ्यावी  मोहीमेदरम्यान घरात उपस्थित नसलेल्या सदस्यांची संपुर्ण माहिती  मो नंवर आरोग्य कर्मचाऱ्याकडे दयावा जेणेकरुन त्यांना संपर्क करुन त्यांची तपासणी करणे शक्य होईल . ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे अवाहन जिल्हाधिकारी श्री.मुगळीकर यांनी केलेल आहे .

संशयीत कुष्ठरुग्णांची लक्षणे : त्वचेवर फीकट / लालसर बधिर चटटा असणे , चटयावरील त्वचा जाड होणे , चेहऱ्याची चकाकी अथवा तेलकट त्वचा , त्वचेवर गाठी येणे कानाच्या पाळया जाड होणे , डोळे पुर्णपणे बंद  होणे , नाकाचे हाड बसणे , हातापायाला मुंग्या येणे , त्वचेवर थंड किंवा गरम संवेदना  जानवणे , हात  पाय बधीर होणे , हाताला  पायाला अशक्तपणा येणे , हातापायाची बोटे वाकडी होणे  जखमा होणे , इत्यादी.

राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत संयुक्त मोहिमेत प्राथमिक अवस्थेतील क्षयरुग्ण शोधुन उपचाराखाली आणणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले . या कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे ( दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला , दोन आठवडयाहून आधिकालावधीचा ताप , वजनात लक्षणीय घट , भुक मंदावणे , छातीमध्ये दुखणे हलकासा परंतु सध्याकाळी वाढणारा ताप  गंभीर प्रकारचा टीबी झाल्यास खोकल्यावाटे कधी कधी रक्त ही पडणे इत्यादी ) असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान  क्षयरोगावरील औषधोपचार मोफत शासकिय  खाजगी संस्थेत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले . या मोहिमेमुळे कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण नोंदणी होण्याचे प्रमाण वाढणे तसेच समाजामध्ये क्षयरोगाबद्दल जनजागृती होऊन क्षयरोगाचे निदान होण्यास मदत होईल . या कार्यक्रतांतर्गत निदान झालेल्या शासकिय  खाजगी संस्थेतील क्षयरुग्णांना निक्षय पोषण आहारासाठी दरमहा रु . ५०० / – मानधन डीबीटी व्दारे अदा करण्यात येत असल्याचे सदरिल बैठकीत सांगण्यात आलेजिल्हयातील सर्व औषधी विक्रेत्यांना क्षयरुग्णांची नोंद करुन त्यांची माहिती प्रत्येक महिन्याच्या  तारखेला जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास देण्याबाबत अवगत केल्याचे सांगण्यात आले.

मोहिमेबाबतची सविस्तर माहिती डॉ . विद्या सरपे सदस्य सचिव तथ सहाय्यक संचालक आरोग्य सेवा ( कुष्ठरोग )  यांनी देऊन शेवटी आभार मानले.

                             000000