परभणी, दि.28 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            मंगळवार दि.29 जून 2021 रोजी नांदेड येथून सकाळी 10.30 वाजता त्रिधारा तिर्थक्षेत्र-उखळद पिंपरी देशमुख प्रजिमा 14 कि.मी.ची सुधारणा करणे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-त्रिधारा तिर्थक्षेत्र ता.जि.परभणी). सकाळी 11 वाजता सावली विश्रामगृहाच्या विस्तारीकरण या कामाचे भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ – सावली विश्रामगृह, परभणी). सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी व अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समवेत आढावा बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). दुपारी 12.45 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टाईप 1, 2, 3 आणि 4 निवासी इमारत बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (शनिवार बाजार, परभणी). दुपारी 1.30 वाजता राखीव. दुपारी 2 वाजता परभणी व पाथरी मतदारसंघ कार्यकर्त्यांची आढावा बैठक (स्थळ- राजयोग मंगल कार्यालय, वसमत रोड, परभणी). सोयीनूसार परभणी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-