Maharshtra News Parbhani News

जिल्ह्यातील रस्ते विकासाला अधिक चालना देवू – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

 

·        जिल्ह्यातील तीन विविध प्रकल्पाचा शुभारंभ

·        लोकप्रतिनिधींच्या समवेत बैठक घेवून विविध प्रश्नांवर चर्चा

 

           परभणीदि.2:- जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या प्रलंबित असलेल्या कामांबाबत यापूर्वी मी संबंधित विभागप्रमुखांना युध्दपातळीवर या कामांच्या पुर्ततेबाबत निर्देश दिले होते. कोविड सारख्या आव्हानात्मक काळात उपलब्ध असलेले मनुष्यबळ लक्षात घेवून यातील बरीचशी काम सुरु झाली आहेत. तथापि ही कामे अधिकाधिक गतीने लवकर पुर्ण व्हावीत यासाठी संबंधितांनी योग्य ती दक्षता घेवून  डिसेंबरपर्यंत रस्ते विकासाची कामे पुर्ण करावीत अशा स्पष्ट सुचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

            परभणी जिल्ह्यातील रस्ते विकासाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ.राहूल पाटील, विधान परिषद सदस्य अमर राजुरकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, महापौर अनिताताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

            परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात हायब्रीड योजनेअंतर्गत 861.48 कोटी रुपयांची 3 कामे मंजूर असून यातून 257.73 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा, 318 पुलमोऱ्या बांधकाम,  एकुण 69 लहान व मोठ्या पुलाची बांधकामे प्रस्तावित आहेत. यातील 163.27 किमी लांबीच्या डांबरीकरण करण्यात आले असून 288 पुलमोऱ्यांची बांधकामे व लहान मोठे 36 बांधकामे पुर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित रस्ते विकासाच्या विविध योजनांच्या कामेही  गुणवत्ता  पुर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.       ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी हायब्रीड योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे गुणवत्तेसह पुर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी पुढे येवून करणे अपेक्षित आहे. यात काही अडचणी असेतील तर पर्यायी विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदअंतर्गत  असलेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्याबाबत लोकप्रतिनिधींचा आग्रह मी समजू शकतो. मात्र यातील मर्यादीत कामे सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे कसे करता येतील ते तपासून घेवू असे त्यांनी स्पष्ट केले.

            जिल्ह्यात एशियन डेव्हलपमेंट बँकअंतर्गत 509 कोटी रुपयांची 82 किमी लांबीचे कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाबार्ड अंतर्गत 190 कोटी रुपये किमतीची कामे प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील ही सर्व कामे विभागून आहेत. यात राष्ट्रीय महामार्गाची कामे केंद्र सरकारकडे आहेत. परभणी जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी  केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही मी संपर्क साधून चर्चा केली आहे. त्यांनाही या कामात लक्ष घालून प्रलंबित असलेली कामे पुर्ण करण्याबाबत विनंती केल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

            खासदार फौजिया खान यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत सुचना देवून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी असे सांगितले. खासदार बंडू जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर यांनी बैठकीत विविध मुद्यावर चर्चा करुन मंत्री अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले.

            बैठकीपुर्वी आज सकाळी 11 वाजता  त्रिधारा येथे त्रिधारा तिर्थक्षेत्र-उखळद-पिंपरी देशमुख प्रजिमा 14 कि.मी.ची सुधारणा करणे, सावली विश्रामगृहाचे विस्तारीकरण व शनिवार बाजारातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टाईप 1, 2, 3 आणि निवासी इमारत बांधकामाचे  भुमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार बंडु जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ.राहूल पाटील, विधान परिषद सदस्य अमर राजुरकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, महापौर अनिताताई सोनकांबळे, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना आदि मान्यवर उपस्थित होते.

-*-*-*-*-

Attachments area

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: