नांदेड : मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो नोकरीतील मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय असो किंवा मुस्लिम आरक्षणाचा विषय असो, हे सर्व विषय केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणीत आले आहेत. ओबीसी समाजाच्या जनगणनेचा डाटा मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिला नाही म्हणून ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. एकूणच भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशातील आरक्षण संपविणे हा अजेंडा असून या अजेंडाची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केला.

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या संदर्भात छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम पुतळ्यास अभिवादन करून उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालकमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ओबीसीची केंद्र सरकारने जनगणना केली आहे. त्यांच्याकडे ओबीसी लोकसंख्येचा डाटा उपलब्ध आहे. परंतु हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्यामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले आहे. हे आरक्षण घालवण्यामागे केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा हात आहे.

यावेळी विधान परिषद प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर व माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी त्यांच्या भाषणातून मोदी सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणावर कडाडून हल्ला केला. महापौर मोहिणी येवनकर यांनी मोदी सरकारच्या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढण्याची सर्वांना शपथ दिली. यावेळी जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर मसूदखान, ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, मनपा सभापती संगीता पाटील डक, संजय देशमुख लहानकर, विजय येवनकर, दिलीप पाटील बेटमोगरेकर, मारोतराव कवळे गुरुजी, एड.सुरेंद्र घोडजकर, पप्पू पाटील कोंढेकर, विठ्ठल पावडे, संतोष पांडागळे, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, सुभाष रायबोले, एकनाथ मोरे, संभाजी भिलवंडे, आनंद भंडारे, विकास देवसरकर, उद्धवराव पवार, जगदीश पाटील भोसीकर, बालाजीराव गव्हाणे, लिंगुराम पाटील, बालाजी पांडागळे, रंगनाथ भुजबळ, शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, दत्ताहरी पाटील चोळाखेकर, मंगलाताई निमकर, डाॅ. रेखा चव्हाण, अनिता इंगोले, कविता कळसकर, अनुजा तेहरा, अमित तेहरा, गंगाधर सोंडारे, रोहिदास जाधव, संजय पांपटवार, संतोष मुळे, मुन्तजीब, मुजीब जहागिरदार, संजय आऊलवार, माधव कदम, कविता मुळे, पद्मा झंपलवार, मंगलाताई धुळेकर, सुमन पवार, विनोद कांचनगीरे, ललिता बोकारे, राजेश्वर शेट्टे, निळकंठ मदने, राजाराम पवार, विजय देवडे, व्यंकटी राऊत, मुसब्बीर खतीब, सुनंदा पाटील, दीपक पाटील, किशन कल्याणकर,सुरेश हटकर, सुनील अटकोरे, अशोक सावंत, सोनाजी सरोदे, प्रवीण देशमुख, गोविंद गोदरे, रणजितसिंघ कामठेकर, भागिरथी बच्चेवार, ललिता पाटील, अनिता गज्जेवार, करुणा जमदाडे, रजियाबेगम, श्रीनिवास जाधव, नारायण जाधव, भगवान जोगदंड, राजू लांडगे, भि.ना.गायकवाड, संदीप गायकवाड, रवी जोंधळे, प्रतिक जमदाडे, विनोद चिंचाळकर, उमाकांत पवार, भगवानराव दंडवे, खाजू इनामदार, बाबूराव अंबोरीकर, गोविंदबाबा गौड, बाबूराव सायाळकर, गोविंद देशमुख, अनिल कांबळे, बालाजी मद्देवाड, मनोहर पवार, किशनराव लोंढे, नागोराव पाटील मोरे, रामराव सोनसळे, डाॅ.मधूकर राठोड, करीम चाऊस, हजप्पा पाटील, गणेश शिंपाळकर, शंकर एंकम, एड.रानवळकर, संतोष पाटील खतगावकर, प्रदीप आंबेकर, मारोती पटाईत, मुन्ना पोवाडे, संजय माने, विजय सूर्यवंशी, सुनील वानखेडे, साईनाथ शिंदे, प्रल्हाद ढगे, दत्तु आलबेलवार, दिगांबर सावंत, देवीदास कुदळेकर, बाबुराव कुदळेकर, बाबूराव गिरे, चाँदपाशा, प्रमोद भुरेवार, किशोर भवरे, दिगंबर मोरे, भाऊसाहेब कदम, एड.सुभाष कल्याणकर, संजय वडजे, उत्तमराव लोंढे, राजप्पा कोत्तावार, डाॅ. विश्वास कदम, ज्योती पवार, शिल्पा नरवाडे, देवसटवार, ललिता कुंभार, अनिता पुरी, अनिता सूर्यवंशी, प्रणिता भरणे, ललिता पाटील, पुनीत रावत, शिला निखाते, ज्योती रायबोले, जयश्री यशवंतकर, सुभाष पाटील, रुद्रा पाटील, अब्दुल गफ्फार, धम्मा कदम, मंगेश कदम, संजय गोटमुखे, निखिल चौधरी, महेश मगर, अमित मुथा, सुखासिंघ हुंदल, यशवंत गाडेगावकर, राजेश पावडे, सत्यपाल सावंत, शंकर नांदेडकर, व्यंकट मुदिराज, अमित वाघ, सुभाष काटकांबळे, जयश्री राठोड, संघरत्न कांबळे, मारोती खांडरे, सदाशिव पुरी, ह्यातखान, सचिन टाले, लक्ष्मीकांत गोणे, जयश्री जायस्वाल, रामराव खांडरे, बालाजी गोडसे, बंदेअलीखान पठाण, कैलास चंद्रे, दत्ता पाटील शिंदे, सतीश देवकते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.