परभणीदि.2:- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत आरोग्य व पॅरामेडीकल क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील कोर्सेस ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण नि:शुल्क असून प्रशिक्षणाअंती उमेदवारांना प्रमाणपत्र व रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी गुगल फॉर्ममध्ये https://docs.google.com/forms/d/1i1jvtzLOQzzgSTgZo4UU8TONROEsXOe8qHV7wumZDLA/edit  या लिंकवर माहिती भरुन दाखल करावी. असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्र.वि.देशमाने यांनी केले आहे.

            राज्यामध्ये कोविड-19 साठीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत आहे. यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी निगडीत पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य शासनाची मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी (दु.02452-220074) सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, तंत्र प्रशाला, स्टेडियमजवळ, परभणी  येथे संपर्क साधावा. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-