Maharshtra News Parbhani News

आयटीआय उमेदवारांसाठी मारुती सुझुकी कंपनीचा भरती मेळावा

      

 

परभणी, दि.23 :- गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील मारुती सुझुकी कंपनीत विविध व्यवयाची पदे भरण्यात येणार आहेत. परभणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बीटीआरआय विभामार्फत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे सोमवार दि.28 जून 2021  रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात फिटर, डिझेल मॅकेनिक, मोटर मॅकेनिक, टर्नर, मशिनिष्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, ट्रॅक्टर मॅकेनिक, पेंटर जनरल आदि व्यवसायाकरीता भरती होईल. तरी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन परभणी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: