Nanded News NANDED NEWS TODAY

मुस्लिम महिला बचत गटांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या ‌2 लाख रुपये पर्यंत व्यवसायिक कर्जाचा लाभ घ्यावा,(युसूफ खानं पटेल)

नांदेड, :मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक महीला बचत गटांना व्यवसायिक 2लाख रुपये कर्ज देण्यास महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मा.ना.नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे, मुस्लिम समाज आर्थिक रुपाने कमजोर असल्याने समाजातील महिला बचत गटांना व्यवसायिक कर्ज देऊन मुस्लिम समाजातील गरीब परिवारासाठी मदत करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्र्याल्यांनी जाहीर केले आहे.

तरी समाजातील महिला बचत गटांनी अर्ज करण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातुन अर्जाचा नमुना प्राप्त करून 21 जुलै 2021 च्या आंत अर्ज सादर करावा व काही अडचणी आल्यास मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा अध्यक्ष युसूफ खानं पटेल यांना संपर्क साधावा कारण की मागील कांग्रेस शासनाच्या काळात आम्हीनं मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजना चा लाभ समाजातील बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करुन अनेक अर्ज शासनाकडून मंजूर करण्याचे कार्य मौलाना आझाद विचार मंचच्या माध्यमातून करण्यात आले होते म्हणून आजही आम्ही या योजनेचा लाभ समाजातील महिलांना मिळुन देण्यास सदैव तयार आहात तरी जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन युसूफ खानं पटेल यांचे द्वारे करण्यात आले आहे.
युसूफ खानं पटेल
9325314171
9422187576

%d bloggers like this: