Maharshtra News Parbhani News

मांडाखळी येथील गट नं.337 मधील 34 आर क्षेत्रासाठी हरासीचे आयोजन

 

 

            परभणी, दि.22 :- परभणी तालुक्यातील मौजे मांडाखळी येथील गट नं.337 मधील एकुण क्षेत्र 34 आरमध्ये सन 2021-22 वर्षाकरीता हरासीचे आयोजन परभणी तहसिल कार्यालयात मंगळवार दि.29 जून 2021 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन परभणीचे तहसिलदार डॉ.संजय बिरादार यांनी केले आहे.

            हरासीसाठी प्रती एकरी शासकीय दर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ठरविल्याप्रमाणे 4 हजार 500 रुपये प्रती एकरी राहील. मोलमजुरीची रक्कम हरासी लावणी रक्कमाशिवाय राहील. जास्तीत जास्त रक्कमेची बोली लावणाऱ्यांच्या नावे लावणी हरास मंजूर करण्यात येईल. हरासी मंजूर होताच 100 रुपये स्टँम्प पेपरवर करारनामा लिहून द्यावा लागेल. हर्रास मंजूर होताच पुर्ण रक्कम जमा करावी लागेल. सरकारी रक्कमेच्या 50 टक्के रक्कम आधी भरल्याशिवाय बोली धारकास बोली बोलण्याची परवानगी नाही. त्या व्यक्तीकडे लावणी हरासीची पुर्वीची रक्कम बकाया आहे अशा थकबाकीदारास बोली बोलता येणार नाही. हरासीचा लिलाव अंतिम करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी परभणी यांच्याकडे राहतील. कोणत्याही बोली कारणास्तव नाकारण्याचे व स्विकारण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी परभणी यांच्याकडे राहतील. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

           

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%