Maharshtra News Nanded News

 परिवहन…

 

परिवहन कार्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीचा

गैरवापर केल्यास होणार कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- परिवहनविभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी परवाना ऑनलाईनद्धतीने देण्यात येत आहे. या लोकभिमुख सोयीसुविधांचागैरवापर होऊ नये यासाठी या प्रणाली आवश्यकत्या सुधारणा करण्यात येत आहेत. या ऑनलाईनसुविधांचा गैरवापर करणारा अर्जदार, संबंधित मध्यस्थ, अनधिकृत व्यक्तीवर आवश्यक ती पोलीस कारवाई उपप्रादेशिक परिवहनअधिकारी यांच्यावतीने केली जाणार आहे. या प्रकरणीदोषी ठरलेला अर्जदार हा मोटार वाहन कायदा कलम19 (इ) अन्वयेअनुज्ञप्ती धारण करण्यास कायमस्वरुपीअपात्र ठरेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

नागरिकांच्या सोयीसाठी  तसेचकोव्हिड -19पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी शिकाऊ अनुज्ञप्ती परवानाऑनलाईन पध्दतीने देण्याची प्रणालीराज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या कार्यप्रणालीद्वारे राज्यातील काही ठिकाणी अनुज्ञप्तीचाचणी ही उमेदवाराऐवजीइतर अनधिकृत व्यक्ती देत असल्याच्या तक्रारी प्राप्तझाल्या आहेत. 

वास्तविक केंद्र मोटार वाहन नियम 11अन्वये, शिकाऊ अनुज्ञप्तीसाठीअर्ज करताना उमेदवारास केंद्रशासनाने विहि केलेली परिक्षादेणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देशसंबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचेचिन्हांचे वाहन चालकाच्याजबाबदाऱ्यांचे महत्व ही माहिती असणे आवश्यक आहे. यामुळेजबाबदार वाहन चालक निर्माणहोण्यास मदत होते. या प्रणालीचावापर करतांना पालकांनीत्यांच्या पाल्यास या परिक्षेचे महत्त्व पटवून दयावे तसेच प्रणालीचा गैरवापरहोणार नाही यांची जाणीव करुन देणे आवश्यकआहे. 

नव्याने सुरु झालेल्या प्रणालीवर राज्यात जवळपास16 हजार 920 शिकाऊ अनुज्ञप्तीतर सुमारे 400 नवीन वाहन नोंदणी करण्यात आली आहे. 

त्याचबरोबर जी महा ई-सेवा केंद्र, मोटार ड्रायव्हिंगस्कूल, इंटरनेटकॅफे या सुविधेचागैरवापर करतील अशा संस्थविरुद्ध पोलीस कारवाईकरुन महा ई-सेवाकेंद्राबाबत जिल्हाधिकारी,मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबत संबंधितप्रादेशिक परिवहन अधिकारी इंटरनेट कॅफेविरुध्द पोलीस विभाग (सायबरसेल) यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. नागरिकांनी असे गैरप्रकारनिदर्शनास आल्यास त्याबाबत स्थानिकप्रादेशिक उपप्रादेशिक परिवहनअधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. या प्रणालीमध्ये नागरिकांनायेणाऱ्या काही अडचणी जसे आधारकार्ड क्रमांक त्यावरील माहिती, फोटोग्राफ हे सारथी प्रणालीवर चुकीच्याद्धतीने दिसत असल्यासअथवा प्रदर्शित होत नसल्यासइत्यादी बाबी या राष्ट्रीयसुचना विज्ञान केंद्र (एनआयसी) दिल्ली पुणे यांच्याशी समन्वयसाधुन त्यामध्ये सुधारणा करण्यातयेणार आहेत असेआवाहन प्रादेशिक परिवहनअधिकारी, नांदेडयांनी केले आहे.

00000

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%%footer%%