ऑक्सफॉम इंडिया या सामाजिक संस्थेकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला साहित्य भेट

            परभणी, दि.23 :- ऑक्सफॉम इंडिया ही एक समाजिक संस्था असून मागील बऱ्याच वर्षापासून सामाजिक काम करत आहे.  आज परभणी जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण जनतेला आरोग्याची मदत मिळावी या हेतूने एका प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरेसे वैद्यकिय सामान अंदाजे 8 लाख रुपये किंमतीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ऑक्सफम इंडिया या सामाजिक संस्थेच्या तर्फे मिशन संजीवनी 2.0 अंतर्गत परभणी जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्र, झरी येथे 

आज दि. 23 जून 2021 रोजी ऑक्सिजन सिलिंडर ( 40 Ltr capacity) – 08, ऑक्सिजन फ्लोमिटर -08, नेब्यूलायझर मशीन 15, सेमिफ्लोर बेड 5, पीपीई किट 100 ग्लोज ,एन -95 मास्क, फेस शिल्ड इत्यादी साहीत्य यावेळी हे सामान पाहून जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी विशेष कौतूक करुन संबंधित संस्थेच्या प्रतिनिधीच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, ऑक्सफॅम इंडियाचे आनंद पेडगावकर उपस्थित होते.

            ग्रामीण जनतेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांची जी धावपळ होते.  ती थांबविण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला मदत मिळण्यासाठी ऑक्सफॉम इंडियातर्फे मिशन संजिवनीच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, सॅनिटायझर, पाच बेड,  हे सर्व वैद्यकिय साहित्य देत आहोत असे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले. ग्रामीण जनतेला वैद्यकिय आधार मिळावा हाच त्यामागचा हेतू आहे. गोरगरीब जनतेचा जो कोरोनामध्ये खर्च होतो तो अवाढव्य असून ग्रामीण भागातल्या सर्व भारतीय बांधवांना मदत मिळावी याच संकल्पनेच्या माध्यमातून पुर्ण साहित्य ऑक्सफॉम इंडियाकडून देण्यात येत आहे. अशी माहिती यावेळी मिळाली.

-*-*-*-*-