परभणीदि.21 :- आंतरराष्ट्रीय योग दिन परभणी डाक विभागात मोठ्या उत्साहात सोमवार दि.21 जून 2021  रोजी साजरा करण्यात आला. या वर्षी डाक विभागाने योगाचे महत्व सांगणाऱ्या विशेष रद्दीकरण मोहराचे अनावरण केले. यावेळी ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन परभणी मुख्य डाक घरात करण्यात आले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाक विभागातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांचे शारीरिक व मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी करण्यात आले आहे. तरी डाक कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरातूनच कुटुंबासमवेत ऑनलाईन योग शिबीरात उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. अशी माहिती पोस्ट मास्तर मोहम्मद अय्युब यांनी दिली.

            परभणी डाक विभागातील प्रधान डाक घर येथे 21 जून 2021 रोजी कार्यालयात सर्व बुक करण्यात आलेल्या आणि वितरणासाठी आलेल्या टपालावर हे विशेष रद्दीकरण मोहर उमटवण्यात आली. ही मोहर विशेष प्रकारे चित्रीत असून हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये मुद्रीत केलेली आहे. योगाचे महत्व सांगणारी  ही विशेष रद्दीकरण मोहर म्हणजे फिलाटेलीसाठी एक पर्वणी होती. यावेळी जागरुकता निर्माण करण्यासाठी परभणी प्रधान डाकघर येथे फिलाटेली संबंधी संकल्पनाची माहिती देण्यात आली.  कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सहाय्यक डाकघर अधिक्षक मोहम्मद खदरी व पोस्टमास्तर मोहम्मद अय्युब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस योगगुरु आर.जे. तिळकरी, जी.डी.भांडारकर यांनी डाक कर्मचाऱ्यांना गुगल मिटद्वारे योगाचे प्रशिक्षण  सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत दिले. तर तंत्रसहाय्यक राजकुमार काळे यांनी केले. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-