National News

अर्धापूरात खासदार राहुल गांधी यांच्या वा ढदिवसानिमित्त पत्रकारांना छत्रीचे वाटप.

अर्धापूरात खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांना छत्रीचे वाटप.

युवक काँग्रेसचे महासचिव उमाकांत ( उमेशभाऊ )सरोदे यांचा उपक्रम.

अर्धापूर( शेख जुबेर )आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे महासचिव उमाकांत (उमेशभाऊ) सोनाजी सरोदे यांच्या वतिने अर्धापूर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना छत्रीचे वाटप करण्यात आले.

शहरातील पंडितराव लंगडे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांना छत्र्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय सेलचे माजी तालुकाध्यक्ष सोनाजी सरोदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायख,पंडितराव लंगडे नगरसेवक इम्रान सिध्दीकी, व्यंकटी राऊत,महमंद सुलतान,माजी सरपंच शंकरराव ढगे,नवनाथ ढगे,मारोती कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार लक्ष्मीकांत मुळे,ओमप्रकाश पत्रे, नागोराव भांगे पाटील, गुणवंत विरकर,रामराव भालेराव, निळकंठ मदने,सखाराम क्षिरसागर,गोविंद टेकाळे,सुभाष लोणे, आजित गट्टाणी,शेख जुबेर, ईरफान पठाण, युनूस नदाफ,गौरव सरोदे,काजी मुख्तारोद्दिन आदी पत्रकार बांधवांना छत्रीचे वाटप करण्यात आले.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: