Maharshtra News Parbhani News

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे नवीन सभासद करण्याबाबत आवाहन

 *

 

            परभणी, दि.16 :- जिल्ह्यात मार्चअखेर 338841 पात्र खातेदारांची संख्या असून आजपर्यंत 18906 नवीन सभासद करुन घेण्यात आले आहेत. तसेच 49988 शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे नव्याने सभासद करुन घेण्याबाबत कार्यवाही सुरु असून पात्र खातेदारांना सभासद करुन घेण्याबाबत विशेष मोहीम सहकार विभागामार्फत राबविण्यात येत आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी मोहिमेअंतर्गत संबंधित गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन, गटसचिव, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून कागदपत्रांची पुर्तता करुन सभासद होण्याची कार्यवाही पुर्ण करावी. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, परभणी यांनी केले आहे.

            ज्या शेतकऱ्यांना किमान 10 आर जमीन आहे असा पात्र खातेदार शेतकरी संस्थेचा सभासद होवू शकतो. संस्थेचे सभासदत्व मिळाल्यानंतर संस्थेद्वारे 3 लाखापर्यंत शुन्य टक्के व्याजदराने पीक कर्जाचा लाभ घेता येतो तसेच इतर योजनांचा देखील लाभ मिळू शकतो. संस्थेच्या निवडणूकीमध्ये, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळू शकतो. सभासद होण्यासाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, सातबारा उतारा, नमुना नं.8 उतारा, दोन पासपोर्ट फोटो, सभासद 100 रुपये आणि भाग रक्कम फिस 100 रुपये आदिसह कागदपत्रे जमा करावे लागतात. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: