Maharshtra News Parbhani News

पिंगळगड नाला येथील पुलावरून जाणाऱ्या जड वाहनांचा मार्गात बदल

 *

      परभणी, दि.14 :- रविवार दि. 13 जून 2021 रोजी झालेल्या पावसामुळे गंगाखेड रोड येथील पिंगळगड नाल्यास पुर आल्यामुळे तेथील जड वाहनांची वाहतुक बंद असुन छोटे वाहनांची वाहतुक सुरु आहे. तरी पिंगळगड नाला येथील पुलावरून जाणाऱ्या जड वाहनाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. जड वाहनांची वाहतूक साखला प्‍लॉट येथील  लोहगाव रोडने  केली  जाईल . अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली

       पिंगळगड नालावरील पुल हा नुकताच बांधण्यात आला असुन पुलाच्या स्लॅब मजबुत होण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हा पुल जड वाहनांच्या वाहतुकीमुळे तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे पिंगळगड नाला येथील वाहतुक ही परभणी येथील साखला प्लॉट येथील लोहगाव रोड येथुन लोहगाव मार्गे सायाळा खटींग , इटलावपूर , आमडापुर फाटा यामार्गे सिंगणापुर फाटा लगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गास दि .14 ते 23 जून 2021 पर्यत जोडण्यात येत असुन दोन्ही ठिकाणी 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवून बॅरेकेटींग ठेवून अपघात होणार नाही याची काळजी  घेतली जाणार आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: