Maharshtra News Parbhani News

हिवताप प्रतिरोध महिना जून -2021 पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

 

 

परभणी, दि. 7:- पावसाळा सुरू झाला आहे. हा काळ कीटकजन्य रोगांच्या प्रसारास अनुकूल असून मुख्यत: याच काळात कीटकजन्य आजार जसे हिवतापडेंग्यूताप व चिकुनगुन्या ताप इत्यादी या आजारांचा प्रसार वाढतो. या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात. त्या अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना म्हणून जून या महिन्यात कार्यक्रम घेतले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जावून जलद ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, डासोत्पती स्थानांत गप्पी मासे सोडणे, आशा कर्मचाऱ्यांची कोविड-19 या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठीचे सर्व नियम पाळुन कार्यशाळा घेवून त्यांना प्रशिक्षण देवून त्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येईल. तसेच हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती परभणीचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.व्ही.आर.पाटील यांनी दिली आहे.

या काळात हिवतापडेंगी व चिकनगुन्यासारखे आजार होतात. या काळात अशा रोगांचे लक्षण आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. एक आठवडयापेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नये. आठवडयातून किमान दोन वेळेस पाणीसाठा रिकामा करून भांडी घासून- पुसून कोरडी करून नंतरच पाणी भरावेत. टायर्स व निरूपयोगी भंगारसामान घराबाहेर किंवा छतावर ठेवू नये. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवून राहून डास उत्पत्ती होते. या सामानाची विल्हेवाट लावावी. कुलरचा वापर कळजीपूर्वक करावा व दर आठवड्याल कुलर स्वच्छ करुन त्यात पाणी टाकावे व त्यातील पाणी वारंवार बदलावे. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तीक संरक्षणासाठी डासांना पळऊन लावणा-या साधनांचा वापर करावा. नाली- गटारे वाहत ठेवावे. जास्त काळ पाणी साठवून राहत असल्यास त्यामध्ये जळालेले तेलवंगणकेरोसीन टाकावे. पाण्याची डबकीतळे याठिकाणी डास अळ्यांना खाणाऱ्या डासअळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. तापाचा रूग्ण आढळून आल्यास त्याने तात्काळ दवाखान्यात जावून औषधोपचार घ्यावायाप्रमाणे उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास किटकजन्य रोग हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या यांचा प्रसार रोखण्यास निश्चितच मदत होईल. असे जिल्हा हिवताप अधिकारीपरभणी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: