Maharshtra News Parbhani News

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमातंर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु

            परभणी, दि. :-  जिल्ह्यात बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नूसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत  निवड यादीत त्याच पालकांनी शाळेत जावून विहीत मुदतीत प्रवेश निश्चित करावा. असे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

            सन 2021-22 या वर्षाची आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया दि.11 जून 2021 पासून सुरु करण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करु नये, शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर जाहीर करावा. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेवून शाळेत जावून आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांवरुन शाळे व निवासी पत्यांच्या अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यास सांगावे. पडताळणी समितीने आलेले अर्ज व तक्रारींची शहानिशाकरुन प्रतिक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देवू नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. व आदेशाप्रमाने शाळेने कार्यवाही करावी. शुक्रवार दि.11 जून 2021 पासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरीता पोर्टलवर दिनांक द्याव्यात आणि आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची  कार्यवाही सुरु करावी. आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु झाले आहेत अशा सुचना शाळेच्या प्रवेशद्वारावर लावावी. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येवू शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहीत मुदतीत दुरध्वनी, ई-मेल अथवा व्हॉटसअपद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही पुर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल त्याबाबतच्या सविस्तर सुचना आरटीई पोर्टलवर दिल्या जातील. असेही कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: