Maharshtra News Parbhani News

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पुर्व तयारीसाठी प्रशिक्षण सुरु

 

 

            परभणी, दि. 8 :-  कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय परभणी येथील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांच्यासाठी Paediatric Covid-19 च्या प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सोमवार दि.7 जून 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे  संपन्न झाले.

            यावेळी  औरंगाबाद शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या बालरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभा खैरे,   औरंगाबाद विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रश्मी खांडेकर,  जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, सहयोगी प्राध्यापक डॉ. तृप्ती जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

            प्रशिक्षणात जिल्हा रुग्णालय परभणी येथील पाच वैद्यकीय अधिकारी, एक परिसेविका व दहा अधिपरिचारिका यांना पाहिल्या टप्प्यात दि. 14 जून 2021 पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पायल निकोसे यांचे सहकार्य लाभले.

-*-*-*-*-

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: