Maharshtra News National News

मोठी बातमी! नांदेडसह राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ‘अनलॉक’, सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे.

यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची ठिकाणं सुरू ठेवता येणार आहेत. या पहिल्या स्तरामध्ये एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: