Maharshtra News

ज्वेलर्ससाठी चांगली बातमी! हॉलमार्किंग नसले तरी आता दंड किंवा शिक्षा नाही; काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबई: पाच लाखांहून अधिक सराफा दुकानदारांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हॉलमार्किंगच्या तरतुदींचे पालन केलेले नसलेल्या ज्वेलर्सवर दंड आकारण्यास BIS ला मनाई केलीय. ही स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम राहणार आहे, जी 14 जून 2021 रोजी होणार आहे. भारतीय मानक ब्युरो ( BIS) कायद्याच्या कलम 29(2) अन्वये ज्वेलर्सविरुद्ध कठोर कारवाई न करण्याचे खंडपीठाने अधिकाऱ्यांना आदेश दिलेत.

1 जून 2021 हॉलमार्किंग अनिवार्य

बीआयएसच्या तरतुदीनुसार, 1 जून 2021 पासून देशातील सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे अनिवार्य होणार आहे. हा नवीन नियम लागू झाल्यानंतर दागिने हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने ठेवू शकणार नाहीत किंवा विकू शकणार नाहीत.

GJC ने ही याचिका दाखल केली होती

ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून, हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासाठी अंतिम तारखेची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, 1 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगची अनिवार्य तरतूद केल्यास देशातील 5 लाख ज्वेलर्स अडचणीत येऊ शकतात. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (GJC ) न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. GJC ज्वेलर्सची बढती, संरक्षण आणि प्रगती सुनिश्चित करते.

GJC ने काय म्हटले ते जाणून घ्या?

माजी GJC चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल म्हणाले की, हॉलमार्किंगचा नियम बंधनकारक असून, तो न पाळल्यास जास्तीत जास्त 1 वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते, असंही BIS च्या नियमात नमूद आहे. दिलेल्या मुदतीत सर्व दागिन्यांना आपल्याकडे असलेल्या सर्व दागिन्यांची हॉलमार्किंग करून घेणे शक्य नसल्याचेही कोर्टाला सांगण्यात आले. सध्या कोविड 19 च्या निर्बंधामुळे आणखी काही समस्या उद्भवल्या आहेत, असेही कोर्टाला सांगण्यात आले. निर्बंधामुळे एखादी व्यक्ती एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाऊ शकत नाही आणि असे बरेच जिल्हा आहेत. अशा परिस्थितीत कोर्टाकडून दिलासा मिळाल्याने नक्कीच ज्वेलर्सना मोठा फायदा होऊ शकतो.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: