Maharshtra News Nanded News

 1 हजार 63…

 

1 हजार 63 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 538 व्यक्ती कोरोना बाधित

15 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 864 अहवालापैकी 568 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 482 तर अँटिजेन तपासणीद्वारे 86 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 84 हजार 127 एवढी झाली असून यातील 75 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 6 हजार255 रुग्ण उपचार घेत असून 194 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 5 ते 7 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 683 एवढी झाली आहे. दिनांक 5 मे रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे हनेगाव ता. देगलूर येथील 70 वर्षाची महिला, दिनांक 6 मे रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तामसा ता. हदगाव येथील 45 वर्षाचा पुरुष, मुक्रामाबाद ता. मुखेड येथील 73 वर्षाचा पुरुष, जनता कॉलनी नांदेड येथील 80 वर्षाची महिला, अर्सजन नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे श्रीनगर नांदेड येथील 75 वर्षाची महिला, मगनपुरा नांदेड येथील 55 वर्षाची महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे दापका ता. मुखेड येथील 70 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे आयप्पा मंदिर किनवट येथील 62 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय येथे पळस ता. हदगाव येथील 80 वर्षाचा पुरुष, निर्माया कोविड रुग्णालय येथे चौफाळा नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, अपेक्षा कोविड रुग्णालय येथे मंठा ता. हदगाव येथील 59 वर्षाचा पुरुष, दिनांक 7 मे रोजी भावसार चौक नांदेड येथील 33 वर्षाची महिला, नांदेड येथील 55 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 176, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, भोकर 21, बिलोली 43, देगलूर 21, धर्माबाद 4, हदगाव 28, हिमायतनगर 15, कंधार 9, किनवट 31, लोहा 2, मुदखेड 15, मुखेड 23, नायगाव 17, उमरी 14, माहूर 22, परभणी 3, हिंगोली 10 व्यक्ती बाधित आढळले तरॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 12, माहूर 4, अर्धापूर 4, भोकर 3, देगलूर 2, बिलोली 1, धर्माबाद 1, हदगाव 11, हिमायतनगर 12, कंधार 1, किनवट 3, लोहा 3, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 6, लातूर 3, यवतमाळ 1, हिंगोली 5, पुणे 1 असे एकूण 568 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 1 हजार 63 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 636, धर्माबाद तालुक्यातंर्गत 19, देगलूर कोविड रुग्णालय 7, अर्धापूर तालुक्यातंर्गत 11, उमरी तालुक्यातंर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 23, मुखेड कोविड रुग्णालय 25, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, किनवट कोविड रुग्णालय 14, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 7, बिलोली तालुक्यातंर्गत 65, खाजगी रुग्णालय 162, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, नायगाव तालुक्यातर्गत 1, कंधार तालुक्यातर्गत 18, लोहा तालुक्यातर्गंत 6, हदगाव तालुक्यातर्गत 11, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 7, मांडवी कोविड केअर सेंटर 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली . 

आज 6 हजार 255 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 70, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 132, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 62, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 59, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 12, बिलोली कोविड केअर सेंटर 94, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 29, माहूर कोविड केअर सेंटर 28, भोकर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 34, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 38 , मुदखेड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर 16, बारड कोविड केअर सेंटर 32, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 21, एनआरआय कोविड केअर सेंटर 58, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 792, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 38, खाजगी रुग्णालय 1 हजार 454 असे एकूण 6 हजार 255 उपचार घेत आहेत. 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 50, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 60, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 79 हजार 297

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 85 हजार 219

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 84 हजार 127

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 75 हजार 901

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 683

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.22 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-22

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-390

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 6 हजार 255

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-194

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: