Maharshtra Marathi News Nanded Marathi News

बुरशीजन्य आजाराची अशी आहेत लक्षणे वेळीच काळजी घेण्याचे आवाहन

                                                     बुरशीजन्य आजाराची अशी आहेत लक्षणे

 वेळीच काळजी घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- कोव्हिड आजार होवून बरे झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड म्युकोर्मिकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळून येत आहे. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूमूळे होतो. अनियंत्रित मधुमेह व कोव्हिड या आजारामूळे हा आजार उध्दभवतो. या आजाराचे लवकर निदान झाले तर पूर्णपणे बरा होतो.  या जंतुसंसर्गामुळे डोळा गमवावा लागु शकतो किंवा जीवघेणा ही ठरु शकतो. याचे उपचार ही खर्चिक आहेत. त्यामूळे लक्षणाची सुरुवात झाली की लगेच नाक-कान-घसा तज्ञांशी संपर्क साधून वेळीच उपचार घ्यावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य  विभागाने केले आहे. या आजाराची सुरुवात नाकापासून होते. टाळू, डोळे व यानंतर मेंदूपर्यत पसरतो. त्यामूळे कोरोनाबाधित रुग्णांनी वेळीच लक्षणे दिसल्यास काळजी घ्यावी व  नाक कान घसा तज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

या बुरशीजन्य आजाराची लक्षणे अशी आहेत. नाकातला श्वास कोंडणे, काळया बुरशीचा चट्टा, नाक, टाळू येथे आढळणे, दात दुखणे, गाल दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना असह्य वेदना होणे, डोळा दुखणे, डोळा सुजणे व दृष्टी कमजोर होणे. आजाराचे स्टेज 1 – नाकापर्यंत मर्यादित (नाक व सायनसेस) स्टेज 2- डोळयापर्यंत पसरणे, स्टेज-3- मेंदुपर्यंत पसरणे (बेशुध्द, अर्धांगवायु. इत्यादी) .

 

नाकाची दुर्बीणीद्वारे तपासणी, नाकातील स्त्रावाची बुरशी जंतुसाठी तपासणी  सिटी स्कॅन व एमआरआय डोळे व सायनसमधील बुरशी जंतुसंसर्ग शोधण्यासाठी  या तपासणी कराव्यात. तसेच या बुरशीजन्य आजारावर बुरशीरोधक औषधी इंजेक्शनस ॲम्फोटेरेसीन-बी, फोसॅकोनॅझोल, सर्जीकल उपचार, सौम्य बिटाडीन नाकाचे ड्रॉप हे उपचार करावेत. तरी सर्व नागरिकांनी यापैकी एक किंवा अनेक लक्षणे कोव्हिडनंतर आढळल्यास त्वरीत  नाक,कान, घसा तज्ञ यांना संपर्क करावा. तसेच महानगरपालिका कोव्हिड हेल्प लाईन क्र. 8956306007 यावर संपर्क करावा असेही कळविले आहे.

0000 

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: