Maharshtra Marathi News Nanded Marathi News

20 एप्रिलपासून किराणा, भाजीपाला-फळविक्रेते सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु

                                                   20 एप्रिलपासून किराणा, भाजीपाला-फळविक्रेते

        सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल2021 रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. या आदेशात पूर्वी दिलेला सकाळी 8  ते 1 या वेळेत बदल करण्यात आला असून हा कालावधी आता कमी केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकानेभाजीपाला दुकानेफळविक्रेतेडेअरी, बेकरीकन्फेक्शनरी, सर्व खाद्य पदार्थाचे प्रकार  (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी इ.) कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादन, पाळीव प्राण्यांच्य अन्न पदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामाशी निगडीत व्यक्तींसाठी तसेच संस्थासाठी देखील साहित्य मिळणारी दुकाने या आस्थापना सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहतील. या दुकानातून घरपोच सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे. सदर आदेशाची अंमलबजावनी 20 एप्रिल 2021 चे रात्री 8 वाजेपासून ते दिनांक 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: